४ कोटींचा टँकर प्रस्ताव सादर, जायकवाडीचे कर्मचारीही २४ तास कार्यरत
सर्व कर्मचारी शिफ्टनुसार
२४ तास कार्यरत असून,
जायकवाडी ते फारोळा आणि
फारोळा ते नक्षत्रवाडी अशा दोन
टप्प्यांत पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र
पथके तैनात करण्यात आली
आहेत.
उत्सवात संभाजीनगर, करण्यात आल्या आहेत. (सांजवार्ता ब्युरो): दिवाळीच्या तसेच शहरातील सुमारे ३०० शहरातील लाईनमनलाही सुटी देण्यात नागरिकांना पाणीटंचाईचा आलेली नाही. जायकवाडीत सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सणांच्या दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण ३५५ जणांच्या सुट्या रद्द
सध्या जायकवाडीतून २२० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात असून, नक्षत्रवाडी येथील एमबीआरपर्यंत पाणी शुद्ध करून शहराला दररोज १८० ते १९० एमएलडी पाणी वितरित केले जात आहे. शहरात मोठी २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी तसेच १२०० व १०० मिमीच्या वाहिन्यांद्वारे पाण्याचे वितरण सुरू आहे.
३०० लाईनमनची सुट्याही रद्द
पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी २४ तास अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. जायकवाडी ते फारोळा आणि फारोळा ते नक्षत्रवाडी अशा दोन टप्प्यात गस्त सुद्धा घातली जात आहे. शहरातील ३०० लाईनमनला सुटी देण्यात आलेली नाही. जायकवाडीत सर्व कर्मचारी शिफ्टनुसार काम करीत आहेत.
शहरात साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने मध्यरात्री काही तास पंपिंग बंद ठेवून पाणी
तात्काळ पुरवले जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी जुन्या योजनांची दुरुस्ती केल्यामुळे
'नो नेटवर्क' क्षेत्रासाठी टँकरचा प्रस्ताव
जलवाहिनी नसलेल्या शहराभोवतालच्या १८० ते २०० नागरी वसाहतींमध्ये महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या व्यवस्थेच्या मुदतवाढीसाठी आणि पुढील खर्चासाठी १३ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत ४ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदाराच्या ९ जूनपर्यंतच्या २ कोटी १० लाखांच्या खर्चास कार्योत्तर मान्यता आणि ३० नोव्हेंबरपर्यंतच्या मुदतवाढीसाठी १ कोटी ९० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
पाणीपुरवठ्चात व्यत्यय येणार नाही, असे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी स्पष्ट केले.
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत पुढील वर्षासाठी ६६ टैंकर भाड्याने घेण्याचे
नियोजन असून, त्यासाठी ५.३९ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.













